ताज्या बातम्या

Ishan Kishan : ईशान किशन धडाकेबाज फलंदाजी! 12 चौकार, 1 षटकारसह इंग्लंडमध्ये केला धमाका

भारतीय खेळाडू ईशान किशनने काउंटी चॅम्पियनशीपमध्ये पदार्पणातच धडाकेबाज फलंदाजीची झलक दाखवली. त्याने ट्रेंट ब्रिजमध्ये दमदार खेळी करत त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले.

Published by : Team Lokshahi

2023 मध्ये भारताच्या बाजूने शेवटच्या आंतरराष्ट्रीय खेळी खेळल्यानंतर नंतर सतत भारतीय संघाकडून दुर्लक्षित केला गेलेला खेळाडू ईशान किशन याने आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन दाखवता यावे यासाठी मोठा निर्णय घेत थेट इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये सहभाग दर्शवला आहे. नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबने ईशान किशनला दोन सामन्यांसाठी करारबद्ध केले आहे. त्यातच आता भारतीय खेळाडू ईशान किशनने भारताबाहेर आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवत दमदार खेळी केली.

भारतीय खेळाडू ईशान किशनने काउंटी चॅम्पियनशीपमध्ये पदार्पणातच आपल्या धडाकेबाज फलंदाजीची झलक दाखवली. त्याने ट्रेंट ब्रिजमध्ये दमदार खेळी करत, त्याने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले. ईशानने पहिल्याच डावात यॉर्कशायर संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत 98 चेंडूंमध्ये 87 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार आणि 1 षटकार मारत धावांचा पाऊस पाडला. ईशान किशन फलंदाजीसाठी सहाव्या स्थानावर येऊनही त्याने आपले अस्तित्व टीमला दाखवून देत नॉटिंघमशरला एक मोठा धावांचा आकडा पार करायला मदत केली.

पदार्पणातच इशानने टेस्टक्रिकेटमध्ये वन डे सारखी खेळी करत अर्धशतकासह 87 धावांचा डोंगर तयार केला. मात्र 13 धावांनी ईशानचे अर्धशतक हुकले. ईशान किशनसाठी हे दोन सामने अत्यंत महत्वाचे असणार आहेत.कारण कारण ईशानचा या दोन सामन्यांमधला परफॉर्मन्स त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाची मोठी संधी असू शकतो. त्यामुळे ईशानला आता या दोन सामन्यांमध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : CSMT परिसरातील वाहतूक पुर्वपदावर

Manoj Jarange Maratha Protest : आंदोलन संपलं! नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी आलेल्या शिदोरीचा पुर; उरलेल्या अन्नाचं काय केलं?

Donald Trump vs PM Modi : ट्रम्प यांची भारताच्या टॅरिफ धोरणावर टीका; अमेरिकन आयात शुल्क कमी करण्याची तयारी

Ajit Pawar On Manoj Jarange Maratha Protest : 'मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न'- अजित पवार