भारतीय रेल्वे मंत्रालयाने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता तत्काळ प्रकारचे तिकीट काढण्यासाठी आधार क्रमांक देणे अनिवार्य असणार आहे. रेल्वे प्रशासनाने 10 जून रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली. सामान्य प्रवाशांच्या उपयोगासाठीच हा बदल केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. या पत्रकानुसार 1 जुलै 2025 पासून आधार प्रमाणित युजर्सच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजे आयआरटीसीच्या संकेतस्थळावरुन किंवा अॅपवरुन तात्काळ तिकीट बुक करू शकतील. या नवीन नियमानुसार 1 जुलैपासून जर तात्काळ तिकीट बुक करायचे असल्यास तुम्हाला आयआरटीसी खातं आधारशी जोडून घ्यावं लागेल. तसेच 15 जुलैपासून रेल्वे तिकीट काऊंटर किंवा अधिकृत एजंटांकडून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी आधार निगडीत ओटीपी लागेल. ओटीपी ऑथेंटिकेट झाल्यावरच तात्काळ तिकीट बुक होईल.
हेही वाचा