भारतीय रेल्वेत नोकरी करू इच्छुकांकरीता आता एक संधी आलेली आहे. भारतीय रेल्वे 1,036 पदांसाठी भरती करणार आहे. विविध श्रेणींमध्ये जवळपास 1,036 जागा भरण्याचे या भरती मोहिमेचे उद्दिष्ट आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकणार आहेत. 30 दिवसांचा कालावधी असेल आणि तारीख ही 7 जानेवारी पासून 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा अर्ज करता येणार आहे. सामान्य, OBC,EWS या घटकातील उमेदवारांसाठी अर्ज करता येणार आहे, तर अर्जाचे शुल्क हे 500 रुपये असणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
एकूण पोस्ट आणि पोस्टचे नाव
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)-३३८
प्राथमिक रेल्वे शिक्षक (PRT)-188
पदव्युत्तर शिक्षक (PGT)-187
कनिष्ठ अनुवादक (हिंदी)-130
वैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण) -3
मुख्य कायदा सहाय्यक- 54
सरकारी वकील- 20
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम)-18
वैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण- 2
वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक- 3
कर्मचारी आणि कल्याण निरीक्षक- 59
ग्रंथपाल -10
संगीत शिक्षक (महिला)- 3
सहाय्यक शिक्षक (महिला) (कनिष्ठ शाळा)- 2
प्रयोगशाळा सहाय्यक/शाळा- 7
लॅब असिस्टंट ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ)-12