IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या... IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...
ताज्या बातम्या

IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...

भारत-पाकिस्तान सामना: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, जाणून घ्या आकडेवारी.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

आज ऐतिहासिक सामना पाहायला मिळणार आहे.

भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

मात्र पाहिल्यास भारताची दुबईतील कामगिरी फारशी समाधानकारक दिसत नाही.

आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना हा दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी मोठा क्रिकेट सोहळा ठरणार आहे. रविवारी, 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत रंगणार आहे. मात्र आकडेवारीकडे पाहिल्यास भारताची दुबईतील कामगिरी फारशी समाधानकारक दिसत नाही.

आजवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यापैकी तीन सामने दुबईत रंगले. दुर्दैवाने, या तीन सामन्यांपैकी पाकिस्तानने दोन वेळा बाजी मारली, तर भारताला केवळ एकदाच विजय मिळवता आला. विशेष म्हणजे, 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताला दुबईत 10 विकेट्सने पराभूत करून धक्का दिला होता.

यानंतर 28 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाच विकेट्सने विजय मिळवत परतफेड केली. पण तिसऱ्यांदा, 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तानने पुन्हा पाच विकेट्सने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. म्हणजेच दुबईच्या मैदानावर पाकिस्तानचा पलडा जड ठरला आहे.

आता आशिया कप 2025 मधील हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारताने गटसाखळीत यूएईवर मोठा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने ओमानवर सहज मात केली आहे. त्यामुळे रविवारीच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार, आणि भारताला दुबईतील निराशाजनक आकडेवारीत बदल घडवता येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा