(Flights Fare Hike) इंडिगो एअरलाइनने अचानक मोठ्या प्रमाणात फ्लाइट रद्द केल्याने देशातील अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर अफाट गर्दी झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता येथे विमानतळांची अवस्था अक्षरशः बस स्थानकासारखी झाली आहे. कंपनीने निवेदन काढून प्रवाशांची माफी मागितली असली तरी हजारो नागरिकांना गंभीर गैरसोय सहन करावी लागत आहे. इंडिगोच्या सेवेत अचानक व्यत्यय आल्याने इतर विमान कंपन्यांनी ताबडतोब तिकीट दर वाढवले. परिणामी, पुणे–मुंबई मार्गावरील भाडे आश्चर्यकारकरीत्या 61 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
पुणे–दिल्ली तिकिटे : अंदाजे २७ हजार रुपये
पुणे–बेंगळुरू तिकिटे : जवळपास ४९ हजार रुपये
सामान्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जे दर बघायला मिळतात, त्यापेक्षा आता देशांतर्गत प्रवासच अतिशय महाग झाला आहे. उदाहरणार्थ, मुंबई–लंडन प्रीमियम इकॉनॉमी तिकीट ५० ते ७० हजार दरम्यान तर मुंबई–थायलंड प्रवास 15 ते 30 हजारात मिळतो. पण पुणे–मुंबई एवढ्या छोट्या मार्गासाठी 61 हजारांचा भुर्दंड बसत आहे.
समस्यांचा परिणाम : फ्लाइट्स रद्द, प्रवासी त्रस्त
सलग चौथ्या दिवशी इंडिगोला तांत्रिक व ऑपरेशनल अडचणींशी सामना करावा लागत आहे. यामुळे कंपनीने देशभरात 600 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केली आहेत. काही विमानतळांवर तर इंडिगोने पूर्ण दिवस उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत एकही इंडिगोची देशांतर्गत फ्लाइट उड्डाण घेणार नाही, असे कंपनीने जाहीर केले आहे. या घोषणेमुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून अस्वस्थता वाढली आहे.
इंडिगोची माफी, प्रवाशांचा वाढता संताप
इंडिगोने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्रासलेल्या आमच्या सर्व प्रवाशांची, ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनःपूर्वक माफी मागतो.”
थोडक्यात
इंडिगो एअरलाइनने अचानक मोठ्या प्रमाणात फ्लाइट रद्द
देशातील अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर अफाट गर्दी झाली आहे.
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे