थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(IndiGo) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत. ज्या लोकांनी इंडिगोची बुकींग केली आहे त्यांना याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आता विमान प्रवासाचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे.
नियमित दरापेक्षा किमान 3 पटीने अधिक दर वाढले आहेत. मुंबई - पुणे विमान प्रवासासाठी ६७,५०० इतके रुपये मोजावे लागत आहेत. तर मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासाचे दर ५५ हजार ते ७२ हजार रुपयांवर गेले आहेत.
मुंबई ते पुणे विमान प्रवासाचे दर 67 हजार 500 रुपयांवर
मुंबई ते दिल्ली विमान तिकीट 55 ते 72 हजार रुपये
मुंबई ते बंगळुरू विमान तिकीट 40 हजार रुपये
मुंबई ते चेन्नई, हैदराबाद, कोलकाता तिकीट 50 हजार रुपये
Summery
इंडिगो विमानसेवा विस्कळीतचा फटका
विमानांच्या तिकीट दरात प्रचंड वाढ
नियमित दरापेक्षा किमान 3 पटीने अधिक दर