ताज्या बातम्या

IndiGo Airlines : इंडिगोच्या विमानांचा खोळंबा कायम, मुंबई एअरपोर्टवर मोठे बदल

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सची (IndiGo Airlines) विमाने सध्या वेळेवर उडत नसल्यामुळे देशभरातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Published by : Varsha Bhasmare

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सची (IndiGo Airlines) विमाने सध्या वेळेवर उडत नसल्यामुळे देशभरातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या इंडिगोच्या विमानांना खूप उशीर होत आहे. तसेच थेट काही विमाने रद्द केली जात आहेत. यामुळे अनेक प्रवाशांना एअरपोर्टवरच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि अडकलेल्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने तातडीने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

विमानांचे तिकीट दर वाढले

इंडिगोच्या विमानाच्या गोंधळाचा परिणाम नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरही झाला आहे. मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना मुंबई आणि पुण्याहून नागपूरला येणाऱ्या विमानांना उशीर होत असल्यामुळे त्रास झाला आहे. त्यामुळे आता अनेक जण समृद्धी महामार्गाचा वापर करून नागपूरला दाखल होत आहे. इतर कंपन्यांच्या विमानांचे तिकीट दर या गोंधळामुळे खूप वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या इंडिगोच्या झालेल्या गोंधळामुळे उपचारासाठी मुंबईला आलेल्या एका कर्करोगग्रस्त महिलेला अडकून राहावे लागले. ही महिला मुंबईच्या टाटा रुग्णालयात आपल्या मुलासोबत आली होती. मात्र विमान रद्द झाल्यामुळे ५ तारखेपासून तिला मुलासोबत एअरपोर्टवर अडकून राहावे लागले आहे. याबद्दलची माहिती इंडिगोला मिळताच त्यांनी या महिलेची समस्या लवकर सोडवली जाईल, अशी माहिती दिली आहे.

मुंबई एअरपोर्टवर खास सुविधा

तसेच एअरपोर्ट प्रशासनाने मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) अडकलेल्या लोकांसाठी खास सुविधा सुरू केल्या आहेत. यावेळी अनेक प्रवाशांसाठी एअरपोर्टवर अतिरिक्त खुर्च्या लावून बसायची चांगली सोय केली आहे. तर ज्या लोकांचे फ्लाईट उशिरा आहेत, त्यांना एअरपोर्ट प्रशासनातर्फेत नाश्ता आणि रिफ्रेशमेंट (चहा-पाणी) दिले जात आहे. तसेच अधिकारी आणि कर्मचारी (CSE) लोकांना माहिती देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी जास्त नेमण्यात आले आहेत. त्यासोबतच एअरपोर्टवरील दुकानांना जास्त जेवण आणि पाण्याची व्यवस्था करुन ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यासोबतच विमाने ज्यांची रद्द झाली, त्यांना लवकर बाहेर जाता यावे, वेगळे गेट्स यासाठी सुरू केले आहेत. लोकांना ताजी माहिती देण्यासाठी हेल्प डेस्क २४ तास सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच एअरपोर्टवर सतत साफसफाई करण्यासाठी जास्त कर्मचारी लावण्यात आले आहेत. तसेच महिलांसाठीची स्वच्छतागृहे आणि बेबी केअर रूम्सच्या स्वच्छतेकडे खास लक्ष दिले जात आहे. प्रवाशांना त्यासोबत रद्द झालेल्या विमानांचे चेक-इन केलेले सामान लवकर मिळावे यासाठी एअरपोर्टने खास टीम तयार केली आहे.

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचे स्पष्टीकरण

तसेच याबद्दल इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. आज सकाळपासून विमानांची उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत. हळूहळू सगळी कामे सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. सध्या आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी कमी झाल्या आहेत. आता लवकरच सर्व काही पूर्वपदावर येईल, अशी माहिती इंडिगोने दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा