भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी 7 मेला पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करून ' ऑपरेशन सिंदूर ' सुरू केले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमा रेषेवरील राजौरी येथे स्थानिकांच्या घरांवर फायरींग केली आहे. यात काही नागरिक मारले गेल्याचं समोर आलं आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये तीन प्रमुख दहशतवादी ठार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानवर भारताच्या एअर स्ट्राईकनंतर इंडिगोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंडिगोने 10 मे पर्यंत 165 पेक्षा जास्त घरगुती उड्डाणं रद्द केली आहेत. हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरहून उडणारी 165 सेवा रद्द केल्या आहेत.