Indigo Team Lokshahi
ताज्या बातम्या

Indigo विमानात बिघाड झाल्यानं पाकिस्तानात उतरवलं; 15 दिवसात दुसरी घटना

भारतीय विमान पाकिस्तानातील कराचीत उतरण्याची गेल्या दोन आठवड्यांतली ही दुसरी वेळ आहे.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : इंडिगोच्या शारजाह-हैदराबाद विमानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे विमान पाकिस्तानातील कराचीत उतरवावं लागलं. विमानाच्या पायलटला तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यावर त्यानं खबरदारी म्हणून विमान पाकिस्तानच्या दिशेनं वळवलं. त्यानंतर कराची विमानतळावर हे विमान उतरवण्यात आलं. विमानाची याठिकाणी तपासणी करण्यात येतेय. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. इंडिगो एअरलाईन्स कराचीला दुसरं विमान पाठवण्याचा विचार करतंय. प्रवाशांना त्या विमानाने पुढील प्रवास करता येईल. एअरलाईन्सने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'शारजाहून हैद्राबादला जाणारं इंडिगो फ्लाइट 6E-1406 कराचीच्या दिशेनं वळवण्यात आलं. वैमानिकाला तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमान कराचीच्या दिशेनं वळवण्यात आलं. प्रवाशांना हैद्राबादला आणण्यासाठी एक अतिरिक्त विमान कराचीला पाठवण्यात येतंय.

तांत्रिक बिघाडामुळे भारतीय विमान पाकिस्तानातील कराचीत उतरण्याची गेल्या दोन आठवड्यांतली ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी स्पाईसजेटचं दिल्ली-दुबई विमान कराचीत उतरावावं लागलं होतं. विमानाचा इंडिकेटर लाइट खराब झाल्यानं वैमानिकांनी हा निर्णय घेतला होता. यानंतर एक अतिरिक्त विमान कराचीला पाठवण्यात आलं, ज्यामध्ये प्रवाशांना बसवून दुबईला नेण्यात आलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पायलटच्या केबीनमधून धूर निघत असल्यानं वैमानिकांना एमर्जन्सी लँडींगसाठी कराचीची मदत घ्यावी लागली होती. तसंच अन्य दोन घटना देखील ताज्या आहेत. यामध्ये स्पाईस जेटच्या विमानातच दोन वेळा बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. तर एक विमान मुंबईत लँड करावं लागलं होतं. या घटना सुरु असल्यानं विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. तर केंद्र सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयाने यानंतर विमान कंपनीला या घटनांबद्दल रिपोर्ट करण्याचे आदेश दिल्याचं देखील समोर आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा