ताज्या बातम्या

Nashik Indiranagar Tunnel : नाशिकमधील इंदिरानगर बोगदा उद्यापासून नऊ महिन्यांसाठी बंद

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इंदिरानगर येथे समांतर नवीन बोगदा उभारण्यात येत आहे. तसेच जुन्या बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी वाढविली जाणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • नाशिकमधील इंदिरानगर बोगदा उद्यापासून नऊ महिन्यांसाठी बंद

  • नवीन आणि जुन्या बोगद्याची लांबी वाढवण्याच्या कामासाठी बंद

  • वाहनचालकांनी सर्विस रोडचा एकेरी वापर करावा.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इंदिरानगर येथे समांतर नवीन बोगदा उभारण्यात येत आहे. तसेच जुन्या बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी वाढविली जाणार आहे. या नवीन कामाची सुरुवात केली जाणार असल्यामुळे सोमवारपासून म्हणजेच 27 ऑक्टोबर 2025 पासून ते 27 जुलै 2026 पर्यंत इंदिरानगर बोगदा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. नाशिक शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर (एनएच-3)इंदिरानगर बोगद्यावर गोविंदनगर- इंदिरानगर अशा दोन्ही बाजूने 'ग्रेड सेपरेट फ्लायओव्हर' बांधण्यात येणार आहे. यामुळे बोगद्याखालून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच गोविंदनगर, इंदिरानगरच्या बाजूने महामार्गाचे समांतर रस्त्यांवरील सर्व्हिस रोड वाहतूकसुद्धा एकेरी करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, आणि नागरिकांची गैरसोय टाळता यावी, यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त किरिथिका सी.एम यांनी वाहतूक मार्गात बदल केला असून विविध अटी-शर्तीच्या अधीन राहून अधिसूचना काढली आहे. वाहनचालकांनी सर्विस रोडचा एकेरी वापर करावा.

बंद राहणारे मार्ग असे

साईनाथनगर सिग्ग्रलकडून गोविंदनगर- सिटी सेंटर मॉल

मुंबईनाका बाजुकडील सर्व्हिसरोडने भुजबळ फार्म, लेखानगर

इंदिरानगर बाजुकडील सर्व्हिसरोडने लेखागरकडून मुंबईनाकाया मार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे

असे असतील पर्यायी मार्ग:

साईनाथनगर सिग्रलकडुन इंदिरानगर बोगदयाकडे येणारी वाहतुक ही इंदिरानगर बोगदा येथुन डावीकडे वळुन सर्व्हिस रोडने लेखानगर मार्गे

सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर कडुन इंदिरानगर बोगदयाकडे जाणारी वाहतुक ही मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगदा येथे डावीकडे वळुन उड्डाणपुल पोल क. १७० येथुन युटर्न घेवुन इतरत्र जातील.

सिटी सेंटर मॉल, गोविंदनगर कडुन इंदिरानगर बोगद्याकडे जाणारी वाहतुक ही मनोहर गार्डन, इंदिरानगर बोगदा येथे डावीकडे वळुन प्रकाश पेट्रोलपंप, मुंबईनाका सर्कल मार्गे इतरत्र जातील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा