अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. नॉर्थ कॅरोलिनात विकेंड पार्टीदरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरून 150 हून अधिक लोकांनी पळ काढत आले प्राण वाचवले. मृत आणि जखमींची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.पोलीस पुढील कारवाई करत आहेत.