ताज्या बातम्या

भारत-पाक सीमेवर हालचाली वाढल्या; दोन दिवसांत सीमेवरील पीक काढणी पूर्ण करा, शेतकऱ्यांना निर्देश

पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भारत-पाक सीमेवर हालचाली वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यातच आता BSF ने सीमेवरील शेतकऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले असून अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला असून भारत-पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांनी दोन दिवसांत पीक काढणी पूर्ण करावी व शेत रिकामे करावे, असे निर्देश सीमा सुरक्षा दलाकडून देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य