Indore Bus Accident Team Lokshahi
ताज्या बातम्या

Indore Bus Accident : लग्नासाठी मुलगी पसंत करुन घरी येताना अमळनेरच्या तरुणाचा काळानं घात केला

मुलगी पसंत करुन अविनाश आपल्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पाडळसर येथे हा तरुण परतत होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

Published by : Sudhir Kakde

चार दिवसांपूर्वी मुलगी पाहण्यासाठी अविनाश संजय परदेशी हा वर्षीय तरुण इंदूरमध्ये गेला होता. त्यानंतर काल मानपानाचा कार्यक्रम आटोपून आनंदानं आज आपल्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पाडळसर येथे हा तरुण परतत होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. इंदूर येथून पुन्हा मूळ गावी येताना नर्मदा नदीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात या तरुणाचा देखील मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या पुलावरून बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात मयत अविनाश परदेशी या तरुणाचा समावेश आहे. अविनाश हा त्याच्या आईसोबत पाडळसरे या गावात राहत होता. कपडे प्रेस करण्याचा व्यवसाय तो करत होता.

अविनाशचा लहान भाऊ अजय व त्याची मावशी मीना परदेशी हे इंदूरमध्ये राहतात. मावशी व लहान भावाने अविनाशला लग्नासाठी इंदूरमध्ये मुलगी पाहिली होती. ही मुलगी पाहण्यासाठी अविनाश चार दिवसांपूर्वी पाडळसरे येथून इंदूरला गेला होता. इंदोर मधील राजेंद्र नगर येथील मुलगी अविनाशने बघितली होती. त्याला ती पसंतही पडली, काल रविवारी माना पानाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर आज इंदूर अंमळनेर बसने अविनाश हा गावी येण्यासाठी बसला. त्याची मावशी व लहान भावाने त्याला बसमध्ये बसवलं. हीच पुढे नर्मदा नदी पात्रात कोसळली. या घटनेत बसमध्ये बसलेल्या अविनाश याचाही मृत्यू झाला.

दरम्यान बस मध्ये बसवल्यानंतर अविनाश याच्या लहान भावाने फोनवरून आई संगीता हिला अविनाश याला बसमध्ये बसवल्याची माहिती दिली होती. तसंच बसचा क्रमांकही सांगितला होता. दरम्यान गावात नर्मदा नदीच्या पात्रात अमळनेर आगाराची बस कोसल्याची माहिती अविनाशची आई संगीता हिला मिळाली. त्यानुसार संगीता यांनी याबाबत इंदूरमध्ये असलेला अविनाश याचा लहान भाऊ अजय यास कळवलं. अजय घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता ती खरी निघाली आणि अपघातात त्याच्या भावाचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा