सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. महागाईमुळे सामान्यांचे हालही होताना दिसत आहेत. अशातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीदेखील वाढलेल्या दिसून येत आहेत. केंद्र सरकारच्या महसूल विभागाने उत्पादन शुल्कामध्ये प्रतिलीटर 2 रुपयांची वाढ करणार असली निर्णय घेतला आहे. या सगळ्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सरासरी 2 रुपयांनी वाढ होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये केलेली वाढ आणि जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये होत असलेले चढ उतार यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये झालेली दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. त्यामुळे सामन्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. सध्या सरकार पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.80 रुपये प्रती लीटर उत्पादन शुल्क आकारत होते. आता ही वाढ झाल्यानंतर पेट्रोलवरील शुल्क 21.90 रुपये आणि डिझेलवरील शुल्क 17. 80 प्रती लीटर होणार आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर कसे ठरतात?
जून 2010 पर्यंत पेट्रोलचे दर हे सरकारकडून ठरवले जात असत. या दरांमध्ये 15 दिवसांनी बदल होत असत. मात्र 26 जून 2010 पासून सरकारने पेट्रोलच्या किंमती निश्चित करण्याची जबाबदारी तेल कंपन्यांवर सोपवली. मात्र 2014 नंतर ही संपूर्ण जबाबदारी तेल कंपन्यांना दिली गेली.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती कशा ठरवल्या जातात ?
तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर. कर, वाहतूक खर्च तसेच इतर बाबींचा विचार केला जातो. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात.