सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्फ्लुएंसर वेगवेगळ्या गोष्टीचे दावे करत असतात. मात्र, एका इन्फ्लुएंसरने केलेल्या दाव्यामुळे आसाम सरकारने त्याच्यावर अॅक्शन घेतली आहे. अभिषेक कर यांनी आपल्या एक पॉडकास्टमध्ये आसाममध्ये तांत्रिक विद्यासंदर्भात एक दावा केला होता. यानंतर मोठा वाद उफाळला होता. यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यामावर पोस्ट करत अभिषेक कर यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
अभिषेक कर हे इन्फ्लुएंसर आहेत. अभिषेक हे फायनान्स क्षेत्रातील कंटेट क्रिएटर आहेत. जे एका युट्यूब पॉडकास्टमध्ये सहभागी झाले होते. या पॉडकास्टमध्ये अभिषेक यांनी आसाममध्ये तांत्रिक क्रिया होत असल्याचा दावा केला होता. अभिषेक यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर वाद उफाळून आला आहे. अखेर आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आली. यामध्ये अभिषेक कर यांनी आसामविषयी केलेल्या दाव्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं म्हटलं आहे.
आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयातील पोस्टमध्ये काय म्हटलं?
रिया उप्रेती नावाच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. ज्यामध्ये अभिषेक कर नावाच्या व्यक्तीने आसामच्या इतिहास आणि परंपरेबाबत अस्वीकार्य टिप्पणी केली आहे. आसामविषयी भ्रम पसरवण्याबाबत अभिषेक यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आसाम सरकारची पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा-
काय केलं होतं वक्तव्य?
अभिषेक कर यांनी दावा केला होता की आसाममधील एका गावातील महिलांकडे तांत्रिक विद्या आहे. ज्या विद्येच्या आधारे त्या कोणलाही बकरी किंवा इतर प्राणी बनवू शकतात.
अखेर अभिषेक यांनी मागितली माफी
आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयातून केलेल्या एक्स पोस्टनंतर अभिषेक कर यांनी उत्तर दिलं आहे. अभिषेक यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. अभिषेक यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि डीजीपी यांच्याकडे माफी मागत म्हटले, की आपल्या वक्तव्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्या सगळ्यांकडे आपण माफी मागत आहोत. कुणाच्या भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. यापुढे अशी चूक होणार नसल्याचं त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तसेच संबंधित व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्याची मागणीही त्यांनी रिया उप्रेती यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
पाहा काय म्हणाले अभिषेक कर?
(Disclaimer- लोकशाही मराठी कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. किंवा कोणताही दावा करत नाही.)