एकीकडे वैष्णवीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दीड वर्षांत तब्बल 30 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्यांमागे मानसिक छळ, हुंड्याची मागणी, पतीचे व्यसनाधीन वर्तन, कौटुंबिक कलह, संशयाचे वातावरण, आर्थिक अडचणी, सासरच्या मंडळींचा अपमानास्पद वागणूक ही मुख्य कारणे आहेत.
पावणे तीनशे महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देत असल्याचे आरोप करत पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. या घटना जानेवारी 2024 पासून ते मे 2025 या कालावधीत घटना घडल्या असून, त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षितच राहिली आहेत.