ताज्या बातम्या

Air India plane crash : :...आणि तिची भविष्यवाणी खरी ठरली! 5 जूनलाच दिली होती अपघाताची कल्पना पण...

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघाताबाबत अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा यांनी आधीच भाकित केल्याची माहिती समोर येत आहे.

Published by : Prachi Nate

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या Dreamliner 789 या विमानाच्या भीषण अपघातात मृत्यु झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील होते, त्यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यु झाला असून त्यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत या विमानात 242 प्रवाशांसह 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता. यावेळी विमानात 169 भारतीय,52 ब्रिटीश प्रवासी होते, तर 7 पोर्तुगीज आणि एका कॅनडियन प्रवाशाचाही समावेश होता. हा विमान अपघात विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळला. यादरम्यान अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आल्या आहेत. तसेच अनेक चमत्कारीक गोष्टी देखील समोर येत आहेत.

या विमानाच्या भीषण अपाघाताबाबत आणखी एक मोठी गोष्ट समोर येत आहे. या अपघाताची 29 डिसेंबर 2024 रोजी एका महिला अ‍ॅस्ट्रोलॉजरने भाकित केलं होत. ज्यात त्यांनी सांगितलं होत की, एका मोठ्या विमान अपघाताची शक्यता आहे. अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा यांची एक्सवरील भविष्यवाणीची पोस्ट अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर व्हायरल होत आहे. अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठा यांनी 29 डिसेंबर 2024 रोजी एक्सवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी भारतीय हवाई क्षेत्राबाबत काही भाकित केलं होत. एवढचं नव्हे तर तिने 5 जूनलाही विमान अपघाताची पोस्ट केली होती.

त्यांनी 29 डिसेंबर 2024 रोजी पोस्ट केलेल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं लहोत की, "2025मध्ये विमान वाहतूक क्षेत्र चांगले काम करेल, विमान अपघाताच्या बातम्या आपल्याला धक्का देऊ शकतात, असे भाकीत दोन महिन्यांपूर्वी केले होते, खालील ट्विट तपासा. विमान वाहतूक क्षेत्रात थोडी सुधारणा आधीच सुरू झाली आहे. जेव्हा गुरु ग्रह मृगशिरा आणि अर्द्राच्या मिथुन भागात असेल आणि दरमहा सुमारे 6.5 अंश वेगाने असेल, तेव्हा विमान वाहतूक भरभराटीला येईल परंतु सुरक्षितता आणि सुरक्षितता कमी असेल."

यानंतर 5 जूनला पोस्ट केलेल्या भविष्यवाणीमध्ये म्हटलं होत की, "टाटा हैदराबादमध्ये राफेल विमानाचे फ्यूजलेज बनवणार आहेत. हा फक्त विमानचालन विस्तार आहे, येत्या दोन वर्षांत इस्रो अवकाश आणि उपग्रह अभियांत्रिकी, अंतराळ पर्यटनात जगाला आश्चर्यचकित करेल. गेल्या वर्षी नक्षत्र संक्रमणाद्वारे हे भाकीत केले होते. 2025 मध्ये विमान अपघात आणि विमान वाहतुकीत विनाश होण्याची भाकित मी अजूनही उंचावत आहे". तिने केलेल्या या पोस्टनंतर 12 जूनला म्हणजेच अवघ्या 7 दिवसांनी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात अहमदाबादमध्ये झाला. त्यामुळे आता त्यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते