Devendra fadnavis on OBC Reservation : "ओबीसींवर अन्याय..." हैदराबाद गॅझेटियर जीआरवर फडणवीसांचं स्पष्टीकरण Devendra fadnavis on OBC Reservation : "ओबीसींवर अन्याय..." हैदराबाद गॅझेटियर जीआरवर फडणवीसांचं स्पष्टीकरण
ताज्या बातम्या

Devendra fadnavis on OBC Reservation : "ओबीसींवर अन्याय..." हैदराबाद गॅझेटियर जीआरवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

फडणवीस स्पष्टीकरण: ओबीसींवर अन्याय नाही, हैदराबाद गॅझेटियर फक्त पुरावा.

Published by : Team Lokshahi

मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा स्वीकार करून त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. मात्र या निर्णयाला काही ओबीसी नेत्यांनी व संघटनांनी विरोध दर्शवला असून, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही यावर आक्षेप नोंदवत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, हा जीआर सरसकट लागू नसून तो फक्त पुराव्याच्या स्वरूपात आहे. मराठवाड्यात निजामशाहीच्या काळातील जातीसंबंधी नोंदी फक्त हैदराबाद गॅझेटियरमध्ये उपलब्ध असल्याने त्या पुराव्यांना ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यामुळे खरे कुणबी असणाऱ्यांनाच लाभ मिळणार असून कुणालाही खोटेपणा करता येणार नाही, असे ते म्हणाले.

फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की या निर्णयामुळे ओबीसी समाजावर कोणताही परिणाम होणार नाही. अनेक ओबीसी संघटनांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले असून, सरकार सर्वांच्या शंका दूर करण्यास कटिबद्ध आहे. त्यांनी छगन भुजबळ यांच्या शंकाही दूर होतील, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देण्याचा सरकारचा हेतू नाही. मराठ्यांना त्यांचा हक्क आणि ओबीसींना त्यांचा हक्क दिला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate : सोन्याच्या दराने ग्राहकांना दिला झटका; 22 कॅरेट सोनं ‘लाखांच्या’ घरात

Jayant Patil Ganpati Visarjan : जयंत पाटलांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन

Latest Marathi News Update live : अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न

Mumbai Police : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारे जेरबंद, पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासा