सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराण-इस्राइल युद्धाकडे लागले आहे. इस्राइल इराणवर सतत हवाई करत आहे. या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी इराणमध्ये असणारे विद्यार्थी इमारतीच्या बेसमेंटमध्ये लपत आहेत. गोळीबार, बॉम्ब हल्ले यामुळे प्रत्येकजण घाबरून गेला आहे. आशा वाईट परिस्थितीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली आहे.
इराणमधील परिस्थिती लक्षात घेता, तेहरानमधील भारतीय दूतावासाने एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे ज्यामध्ये सर्व भारतीय नागरिकांना आणि पीआयओना घरातच राहण्याचे आणि दूतावासाने दिलेल्या टेलिग्राम लिंकशी कनेक्ट होण्याचे आवाहन केले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की भीतीचे वातावरण इतके खोल आहे की केवळ सल्ला आणि संदेश देऊनही दिलासा मिळत नाही. इम्तिसाल मोहिदीन भावनिकपणे म्हणाले, "परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वी आम्ही भारत सरकारला हात जोडून विनंती करतो की आम्हाला येथून लवकरात लवकर बाहेर काढावे."
जम्मू आणि काश्मीरमधील सोपोर येथील रहिवासी मिधाटने सांगितले की ज्या रात्री पहिला हल्ला झाला ती सर्वात भयानक होती. ANI शी बोलताना तिने सांगितले की, "स्फोटांचा आवाज इतका जवळून येत होता की जणू काही इथेच घडत आहे असे वाटत होते. सगळीकडे गोंधळ होता. सगळे घाबरले होते. आम्ही सतत आमच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहोत."
पुढे ती म्हणाली की, "आमच्यापैकी बहुतेक विद्यार्थी आता आमच्या अपार्टमेंटमध्ये दिवस घालवत आहेत. आम्हाला इतके भीती वाटते की बाहेर जाण्याची हिंमत होत नाही. इराणच्या मर्यादित हवाई हद्दीमुळे आणि सतत होणाऱ्या बॉम्बस्फोटांमुळे, विद्यार्थ्यांना परिस्थिती कधी सामान्य होईल हे माहित नाही. आता फक्त भारतात परतण्याची आशा बाळगून आहेत".