Apurva Gore & Anshuman Joshi Wedding 
ताज्या बातम्या

Introducing you all गोरेंचा जावई... म्हणत अपुर्वा गोरेने दिलं चाहत्यांना खुशखबर

Apurva Gore & Anshuman Joshi Wedding : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय. अनेक लोकप्रिय अभिनेत्री आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

Published by : Riddhi Vanne

Apurva Gore & Anshuman Joshi Wedding : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय. अनेक लोकप्रिय अभिनेत्री आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. याच यादीत आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचंही नाव सामील झालं आहे.

काही दिवसांपूर्वी अपूर्वाने लग्न ठरल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा न दाखवता तिने सगळ्यांची उत्सुकता वाढवली होती. अखेर आता अपूर्वाने कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत तिच्या होणाऱ्या पतीची ओळख करून दिली आहे.

अपूर्वा लवकरच अभिनेता अंशुमन जोशीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ‘शाळा’ चित्रपटातून ओळख मिळवलेल्या अंशुमनने अभिनयासोबतच लेखन, दिग्दर्शन आणि फोटोग्राफीमध्येही आपली वेगळी छाप पाडली आहे. कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत अपूर्वाने दोन्ही कुटुंबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर अपूर्वा सध्या ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात दिसत आहे. तर छोट्या पडद्यावर ईशा या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

थोडक्यात

  1. मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय.

  2. अनेक लोकप्रिय अभिनेत्री आयुष्यातील नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

  3. याच यादीत आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचंही नाव सामील झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा