ताज्या बातम्या

Municipal Corporation Election 2026 : बिनविरोध निवडणुकांची चौकशी करा; राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु 15 जानेवारी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्यात 29 महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु 15 जानेवारी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्यातील विविध महापालिकांमध्ये 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी पक्ष दबावतंत्र वापरुन निवडणूक बिनविरोध करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. विरोधी उमेदवारांवर दबाव, अमिष दाखवून किंवा जबरदस्ती करुन नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का? याची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) दिले आहे. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नसल्याची देखील माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत (Kalyan-Dombivli Municipal Corporation) भाजपचे (BJP) 14 तर शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. तर पुणे (Pune) , अहिल्यानगर (Ahilyanagar) महापालिकेत देखील भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. तर दुसरीकडे कुलाबातील तीन प्रभागांत काँग्रेस, जनता दल आणि आपचे उमेदवारांनी दबावाखाली नामनिर्देशन न स्वीकारल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता या प्रकरणाची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

भाजपाचे 45 उमेदवार बिनविरोध

तर दुसरीकडे राज्यातील विविध महापालिकेत भाजपचे तब्बल 45 नगरसेवक बिनविरोध विजयी झाल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे 19 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 तर मालेगावमधून इस्लाम पार्टीच्या एक उमेदवाराला बिनविरोध विजय मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा