आयफोन 17 लाँच झाल्यापासून अनेकांची नजर त्याच्यावर होती, पण जास्त किंमतीमुळे खरेदी थांबली होती. आता मात्र हा फोन स्वस्तात मिळण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टचा रिपब्लिक डे सेल 2026 येत्या 16 जानेवारीपासून सुरू होत असून, या सेलमध्ये आयफोन 17 मोठ्या सवलतीत मिळणार आहे.
लाँचवेळी सुमारे 82,900 रुपयांचा असलेला हा फोन आता जवळपास 74,990 रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. त्यात जुना फोन दिल्यास आणखी एक्सचेंजचा फायदा मिळू शकतो. एकूणच ग्राहकांची चांगलीच बचत होणार आहे.
या सेलमध्ये केवळ आयफोनच नाही, तर सॅमसंग, पिक्सेल, मोटोरोला, रियलमी यांसारख्या ब्रँड्सचे फोनही कमी दरात मिळणार आहेत. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, आयफोन 17 मध्ये दमदार प्रोसेसर, मोठा आणि स्मूथ डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा आणि आकर्षक रंगांचे पर्याय देण्यात आले आहेत. महाग वाटणारा आयफोन आता परवडणारा झाला आहे. नवीन फोन घ्यायचा असेल, तर ही संधी नक्कीच सोडू नका!