चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव करत आपलं खातं उघडलं आहे. मुंबईने 155 धावा केल्या असून चेन्नईला विजयासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने 19.1 ओव्हरमध्ये 158 धावा केल्या. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे.
मुंबईला यावेळीसुद्धा आयपीएल स्पर्धेत पहिल्या सामन्यात विजय मिळवता आलेला नसून अखेरच्या षटकात चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 6 चेंडूत 4 धावांची गरज असताना रचिनने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात ऋतुराज गायकवाडने 53 धावांची खेळी केली. महेंद्रसिंह धोनी झिरोवर नॉट आऊट परतला. रवींद्र जडेजा याने 17 धावा केल्या. सॅम करन याने 4 धावा केल्या, राहुल त्रिपाठी याने 2 धावा केल्या, त्यानंतर शिवम दुबे 9, तर दीपक हुड्डा याने 3 धावा केल्या. रचीन रवींद्र याने 45 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 65 रन्स केल्या.