भारत-पाकिस्तान (India - Pakistan ) दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर आयपीएलचे (IPL 2025 ) सामने स्थगित करण्यात आले होते. आता भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीएलचे नवीन वेळापत्रक समोर आले आहे.
येत्या 17 मे पासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार असून दोन दिवशी दोन सामने असणार आहेत.
आयपीएलचे नवे वेळापत्रक (IPL 2025 ) जाहीर करण्यात आलं असून आता उर्वरित 17 सामने खेळवण्यात येणार असून अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.