पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करून एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. या हंगामाच्या सुरुवातीला सूर्याला मोठी खेळी करता आल्या नाहीत. परंतु त्याने सर्व सामन्यांमध्ये छोट्या-मोठ्या प्रभावी खेळी खेळून महत्त्वाचे योगदान दिले. त्या खेळींमुळे सूर्याने आपल्या नावावर एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. सूर्यकुमार हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सलग 25+ धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
सोमवार 26 मे रोजी जयपूर येथे आयपीएलच्या 69 व्या सामन्यात मुंबई आणि पंजाब किंग्ज आमनेसामने होते. दोन्ही संघांसाठी या हंगामातील लीग टप्प्यातील हा शेवटचा सामना होता. तसेच, प्लेऑफमध्ये पहिले किंवा दुसरे स्थान मिळवण्याच्या दृष्टीने ही एक मोठी स्पर्धा होती. अशा परिस्थितीत, मुंबईला त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या फलंदाजाकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा होती आणि सूर्यकुमार यादवने ही जबाबदारी लीलया पार पाडली.
आयपीएलच्या कोणत्याही हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू सचिन तेंडुलकर आहे, ज्याने 2010 मध्ये 47.5 च्या सरासरीने आणि 133 च्या स्ट्राईक रेटने 678 धावा केल्या. या यादीत सूर्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे. सचिन चौथ्या स्थानावर आहे आणि लेंडल सिमन्स पाचव्या स्थानावर आहे.