Sadanand Date Sadanand Date
ताज्या बातम्या

Sadanand Date : IAS प्रमुखपदावरून मुक्त, आता महाराष्ट्राची जबाबदारी, सदानंद दाते DGP होणार?

महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी सदानंद दाते यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने त्यांना एनआयए प्रमुख पदावरून मुक्त केले.

Published by : Riddhi Vanne

महाराष्ट्राच्या पुढील पोलीस महासंचालकपदासाठी सदानंद दाते यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने त्यांना एनआयए प्रमुख पदावरून मुक्त केले असून, राज्य सरकारने त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे.

सध्याच्या डीजीपी रश्मी शुक्ला या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नियुक्तीसाठी राज्य गृह विभागाने सात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे यूपीएससीकडे पाठवली आहेत. यामध्ये दाते यांचे नाव महत्त्वाचे मानले जात आहे. यूपीएससीकडून तीन अधिकाऱ्यांची यादी तयार झाल्यानंतर अंतिम डीजीपी ठरवला जाणार आहे. दाते यांची निवड झाल्यास ते 31 डिसेंबरला पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2026 पर्यंत असेल.

सदानंद दाते हे पुण्यात जन्मलेले 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते कडक शिस्त, प्रामाणिकपणा आणि ठाम निर्णयांसाठी ओळखले जातात. आर्थिक गुन्हे, सायबर विभाग, रेल्वे पोलीस, नवी मुंबई एसपी, मिरा-भाईंदर आयुक्त, एटीएस प्रमुख अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्यांनी धाडस दाखवत दहशतवाद्यांचा सामना केला होता. त्या वेळी ते गंभीर जखमी झाले तरी त्यांनी कर्तव्य निभावले.

एनआयएचे प्रमुख म्हणूनही त्यांनी अनेक गंभीर दहशतवादी प्रकरणांचा तपास केला आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या पुढील डीजीपीपदासाठी त्यांचे नाव मजबूत मानले जात आहे. आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा