इनोव्हा कारने श्रीशैलमला जात असताना दुपारी 12 च्या सुमारास घाटमार्गावर त्यांच्या कारला एका एसटी बसने धडक दिली. दोघांनीही सीट बेल्ट घातले नव्हते. सुधाकर पठारे यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर भागवत खोडके यांच्या पायाला आणि अंतर्गत दुखापती झाल्या. खाजगी रुग्णालयात पोहोचताच दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. सध्या शवविच्छेदन सुरू आहे. मुंबई पोलीसांच्या पोर्ट झोनचे डीसीपी डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे.
सुधाकर पठारे प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होता. आज सुट्टी असल्याने ते फिरायला गेले होता, तेव्हा दुसऱ्या गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दुपारी १२ वाजता हा अपघात झाला. सुधाकर पठारे यांना आगामी काही दिवसांत डीआयजी म्हणून पदोन्नती मिळणार होती. जेव्हा बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता व त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला, तेव्हा सुधाकर पठारे तिथे डीसीपी होते.