iranvsisrael war latest updates 
ताज्या बातम्या

Iran vs Israel War: अखेर इस्त्रायलचा इराणवर डाव; आण्विक केंद्रावर...

इस्त्रायलने नव्या हत्याराचा उपयोग केला. इराणवर सायबर हल्ला चढवला. त्यामुळे इराणच्या सर्व सेवा विस्कळीत झाल्या. अंतर्गत संपर्काचं दळणवळण कोलमडलं.

Published by : Team Lokshahi

इराण आणि इस्त्रायलमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. हमासनंतर आता इस्त्रायलने हिजुबल्लाहकडे मोर्चा वळवला. तर या संघटनेला रसद पुरवणाऱ्या इराणला धडा शिकवण्याचा चंगच इस्त्रायलने बांधला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यानंतर योग्य वेळी धडा शिकवण्याचा इशारा इस्त्रायलने दिला आहे. त्याचीच एक छोटी चुणूक या छोट्या देशाने इराणला दाखवली आहे. इस्त्रायलच्या या एकाच हल्ल्याने इराण रडकुंडीला आला आहे. हिजबुल्लाहने तर अगोदरच नांगी टाकली आहे. आता इराण मेटाकुटीला आले आहे.

इराण आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातच आज इस्त्रायलने एक मोठा डाव टाकला. इराणच्या आण्विक ठिकाणासह सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले. अर्थात इस्त्रायलने नव्या हत्याराचा उपयोग केला. इराणवर सायबर हल्ला चढवला. त्यामुळे इराणच्या सर्व सेवा विस्कळीत झाल्या. अंतर्गत संपर्काचं दळणवळण कोलमडलं. इराणच्या सायबरस्पेस या सर्वोच्च संस्थेचे माजी सचिव फिरोजबादी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार न्यायापालिका, कार्यपालिका आणि संसदेचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इराणची यंत्रणा मेटाकुटीला आली. या सायबर हल्ल्यात इराणच्या आण्विक तळांना पण लक्ष्य करण्यात आले. 1 ऑक्टोबर रोजी इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर त्याचा बदल घेण्याचा आणि प्रतिहल्ल्याचा इशारा इस्त्रायलने दिला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा