ताज्या बातम्या

सिगारेटनं पेटवला 'त्या' नेत्याचा फोटो.. उडाली झोप, तरुणीचे अनोख आंदोलन; नेमकं प्रकरण काय?

Iran Ayatollah Khamenei Protest : जगाच्या इतिहासात अनेक आंदोलनांनी सत्ताधाऱ्यांची मुळे हादरवली आहेत. असंच काहीसं सध्या इराणमध्ये घडताना दिसत आहे.

Published by : Riddhi Vanne

Iran Ayatollah Khamenei Protest : जगाच्या इतिहासात अनेक आंदोलनांनी सत्ताधाऱ्यांची मुळे हादरवली आहेत. असंच काहीसं सध्या इराणमध्ये घडताना दिसत आहे. महिलांवर लादलेल्या कडक नियमांविरोधात आता इराणमधील तरुणींनी थेट सर्वोच्च नेतृत्वालाच आव्हान दिलं आहे.

इराणमध्ये महिलांना हिजाब सक्तीचा नियम आहे. या नियमाविरोधात अनेक वर्षांपासून असंतोष आहे. आधी शांत निषेध, मग रस्त्यावर उतरणं आणि आता आंदोलनाने आणखी टोकाचं वळण घेतलं आहे. तरुण मुली थेट अयातुल्ला खामेनी यांच्या सत्तेविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

या आंदोलनाची पद्धत सध्या जगाचं लक्ष वेधून घेत आहे. काही तरुणी खामेनी यांचे फोटो जाळत आहेत आणि त्याच आगीवर सिगारेट पेटवत निषेध व्यक्त करत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हा निषेध तीन वर्षांपूर्वी हिजाब आंदोलनात मृत्यू पावलेल्या महसा अमिनीच्या आठवणींशी जोडला जात आहे.

हे आंदोलन केवळ एका नेत्याविरोधात नाही, तर महिलांवर लादलेल्या सामाजिक आणि धार्मिक बंधनांविरोधात आहे. आर्थिक अडचणी, बेरोजगारी आणि दडपशाहीमुळे आधीच संतप्त असलेल्या इराणमध्ये या आंदोलनामुळे अस्थिरता वाढली आहे. पुढे परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल, याकडे आता संपूर्ण जग लक्ष ठेवून आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा