थोडक्यात
आयआरसीटीसीची वेबसाईट पडली बंद
मोबाईल अॅप देखील पडलं बंद, प्रवाशांची गैरसोय
काल सकाळी 9 वाजेपासून वेबसाईटवर तांत्रिक अडचणी
(IRCTC) आयआरसीटीसीची वेबसाईट बंद पडली असून त्यामुळे रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना अडचणी आल्या. काल सकाळी 9 वाजल्यापासून वेबसाईटवर तांत्रिक अडचणी आल्या. 6 हजारांहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर याच्या तक्रारी केल्या असल्याची माहिती मिळत आहे.
आयआरसीटीसीवर एसी क्लाससाठी तात्काळ तिकिटांची बुकिंग वेळ सकाळी 10 वाजता आहे, तर स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकिटांची बुकिंग वेळ सकाळी 11 वाजता आहे. वेबसाईटसोबतच मोबाईल अॅप देखील बंद पडल्यामुळे प्रवाशांना अडचणींना सामना करावा लागला.
ही समस्या लवकरात लवकर दूर केली जाणार असून तांत्रिक कारणामुळे ही निर्माण झाली असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.