खातेवाटप जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बीडमध्येच रोष वाढत चालला आहे. बीडच्या मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुंडेंना अटक व्हावी आणि मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी आरोप होत असताना धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र आता विरोध वाढू लागल्यानं धनंजय मुंडेंची अडचण होण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हे मराठा समाजाचे नेते होते, आणि त्यांचा सर्वात मोठा अडसर मंत्री धनंजय मुंडे यांना होता. त्यामुळेच परळीत त्यांची आपल्या मंत्रिमंडळातील नेत्याने वाल्मीक कराड यांच्यामार्फत देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप करत मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं अजित पवारांनी निवेदन दिलं आहे.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे उद्या बीडच्या परळीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आल्यानं ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे यावर मुंडे काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वाल्मीक कराड प्रकरणाबाबत मुंडे यावेळी भूमिका स्पष्ट करतील. त्यामुळे धनंजय मुंडेंवरचा रोष शमणार की आणखी वाढणार हे पाहावं लागेल.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन
बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. त्या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील आणि त्याचा कोणाशी राजकीय सबंध असतील तरी त्यांना कठोर शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-