ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे मेळाव्यात 'या' विषयावर बोलण्याची शक्यता?

ठाकरेंच्या शिवसेनेने आपली 58 वर्षाची शिवतेर्थावरील दसरा मेळाव्याची (Thackeray Dussehra Rally 2025) परंपरा सुरू ठेवत आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता संस्कृती आणि परंपरा जपत दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्र पूजन आणि सोने वाटप कार्यक्रम होईल.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • यंदाचा दसरा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी का महत्त्वाचा?

  • स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व

  • राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचा काय?

ठाकरेंच्या शिवसेनेने आपली 58 वर्षाची शिवतेर्थावरील दसरा मेळाव्याची (Thackeray Dussehra Rally 2025) परंपरा सुरू ठेवत आज (2 ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता संस्कृती आणि परंपरा जपत दसऱ्याच्या निमित्ताने शस्त्र पूजन आणि सोने वाटप कार्यक्रम होईल. ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात सुरुवातीला काही नेत्यांची भाषणे होतील आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray speech Shivaji Park) भाषण होईल. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एक प्रकारे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. मनसे युती संदर्भात उद्धव ठाकरे (Raj Thackeray Uddhav Thackeray unity) आपल्या भाषणातून काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नव्याने उत्साह भरतील.

यंदाचा दसरा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी का महत्त्वाचा?

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई

दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा

दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का? याचे संकत देणारा मेळावा, मनसे युती संदर्भात स्पष्टता उद्धव ठाकरे आजच्या भाषणात आणू शकतात.

राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीचा काय?

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना काय सूचना देणार?

शिंदेंकडून ठाकरे गटाला पाडले जात असलेले खिंडार शिंदे गटात होत असलेले पक्ष प्रवेश यावर भाष्य उद्धव ठाकरे करू शकतात.

राज्यातली पूरपरिस्थिती- शेतकऱ्यांना मिळत असलेली अपुरी मदत,मेळावा रद्द करून उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्तांना मदत करावी भाजपने मांडलेली भूमिका. केंद्राकडून शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान झालेला क्रिकेटचा सामना

सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, मुंबईतील विविध प्रश्न या सगळ्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Bhagwangad : Dasara Melava : भगवानगडावरील दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो

Manoj Jarange Patil : दसरा मेळाव्याआधीच मनोज जरांगे पाटील यांचे, आव्हान म्हणाले...

PM Narendra Modi : RSSच्या शताब्दीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Latest Marathi News Update live : राज्यात आज 5 दसरा मेळावे होणार