Z P Elections Z P Elections
ताज्या बातम्या

Z P Elections 2025 : जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता?

राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. 50 % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला 15 जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.

Published by : Riddhi Vanne

(Z P Elections) राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या विचारात आहे. 50 % आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून हा निर्णय होऊ शकतो. सुरुवातीला 15 जिल्हा परिषदांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे, तर उर्वरित 17 जिल्हा परिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या 21 जानेवारीच्या सुनावणीनंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होतील.

राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. 20 डिसेंबर रोजी उरलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 21 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच आता राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या जोरदार हालचाली निवडणूक आयोगात सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्यास सर्व पक्षीय नेत्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळू शकणार आहे. त्यामुळे या निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तवली जाता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. यावेळी कोर्टाने या पुढच्या कोणत्याही निवडणुकीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका असं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याचं नियोजन करण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. ज्या ठिकाणी 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा विचार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

15 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे त्या 17 जिल्हा परिषदा सोडून इतर 15 जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोग करत आहे.

कोणताही अडसर नसेल तर…

महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुठलाही अडसर नसल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कुठलेही निर्देश याबाबत दिलेले नसल्याने महापालिका निवडणुका सुद्धा नगरपालिका नगर पंचायती निवडणुकीनंतर घेण्यासंदर्भात हालचाली राज्य निवडणूक आयोग करत आहे. ज्या मतदार संघांतील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे, त्या 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकते.

निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकत नाही

जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली पूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. तर पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारी रोजी होणार असल्याने निवडणुका फार पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचा अडसर नाही त्या ठिकाणी निवडणुका देण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोगासाठी मोकळा आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा