ताज्या बातम्या

Aadhaar Card Tips : तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? UIDAI ने सांगितले 5 महत्त्वाचे नियम

आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड केवळ ओळखपत्र न राहता प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे.

Published by : Varsha Bhasmare

Aadhaar Card Tips आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड केवळ ओळखपत्र न राहता प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे. शाळा–कॉलेजमध्ये प्रवेश, नोकरीसाठी अर्ज, बँक खाते, सिम कार्ड, सरकारी योजना तसेच विविध ऑनलाइन सेवा या सगळ्यांमध्ये आधार कार्ड अनिवार्य ठरत आहे. मात्र, आधार कार्डचा वाढता वापर जितका सोयीचा आहे, तितकाच त्याचा गैरवापर होण्याचा धोका देखील वाढला आहे. ते.

याच पार्श्वभूमीवर UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. UIDAI च्या मते, आधारशी संबंधित माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल्यास आर्थिक फसवणूक, ओळख चोरी किंवा सायबर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आधार सुरक्षेबाबत जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे.

1) कधीही OTP शेअर करू नका

आधारशी संबंधित कोणताही व्यवहार करताना OTP (वन टाइम पासवर्ड) हा सर्वात महत्त्वाचा सुरक्षेचा भाग असतो. UIDAI ने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही बँक कर्मचारी, एजंट किंवा अधिकाऱ्याला OTP सांगू नये. OTP शेअर केल्यास तुमच्या आधारशी संबंधित माहिती गैरवापरासाठी खुली होऊ शकते.

2) बायोमेट्रिक लॉक सुरू ठेवा

UIDAI च्या वेबसाईट किंवा ‘mAadhaar’ अ‍ॅपद्वारे तुमचे फिंगरप्रिंट, डोळ्यांची ओळख (आयरीस) आणि फेस डेटा लॉक करता येतो. यामुळे कोणीही तुमची बायोमेट्रिक माहिती वापरू शकणार नाही. गरज भासल्यास ही सुविधा तात्पुरती अनलॉकही करता येते.

3) आधारची माहिती ऑनलाइन शेअर करू नका

सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप किंवा कोणत्याही सार्वजनिक वेबसाईटवर आधार कार्डचा फोटो किंवा तपशील टाकू नका. सायबर गुन्हेगार ही माहिती सहज कॉपी करून आर्थिक फसवणूक करू शकतात.

4) ‘Masked Aadhaar’ चा वापर करा

ओळख पुराव्यासाठी आधार द्यावा लागल्यास पूर्ण आधार कार्डऐवजी ‘मास्क्ड आधार’ वापरण्याचा सल्ला UIDAI देत आहे. यात आधारचे पहिले 8 अंक लपवलेले असतात आणि केवळ शेवटचे 4 अंक दिसतात.

5) केवळ अधिकृत हेल्पलाइनवरच संपर्क साधा

आधारचा गैरवापर झाल्याची शंका असल्यास तात्काळ सायबर क्राईम हेल्पलाइन 1930 वर तक्रार करा. तसेच आधारशी संबंधित कोणत्याही मदतीसाठी UIDAI हेल्पलाइन 1947 वरच संपर्क साधावा.

UIDAI च्या या 5 सोप्या पण महत्त्वाच्या नियमांचं पालन केल्यास तुमचं आधार कार्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित राहू शकते. डिजिटल युगात थोडीशी जागरूकता तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणींपासून वाचवू शक

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा