Cricket News : टीम इंडियातून वगळता, इशान किशनने घेतला मोठा निर्णय; आता थेट 'या' संघासोबत खेळणार  Cricket News : टीम इंडियातून वगळता, इशान किशनने घेतला मोठा निर्णय; आता थेट 'या' संघासोबत खेळणार
ताज्या बातम्या

Cricket News : टीम इंडियातून वगळता, इशान किशनने घेतला मोठा निर्णय; आता थेट 'या' संघासोबत खेळणार

क्रिकेट बातमी: इशान किशन इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार, नॉटिंगहॅमशायरसाठी दोन सामन्यांचा करार.

Published by : Riddhi Vanne

Ishan Kishan News : भारताच्या बाजूने 2023 मध्ये शेवटच्या आंतरराष्ट्रीय खेळी खेळल्यानंतर आता ईशान किशनने Ishan Kishan खेळाचे शानदार प्रदर्शन दाखवले आहे. यासाठी मोठा निर्णय घेत थेट इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये सहभाग दर्शवला आहे. नॉटिंगहॅमशायर Nottinghamshire क्रिकेट क्लबने ईशान किशनला Ishan Kishan दोन सामन्यांसाठी करारबद्ध केले आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडू ईशान किशनला भारताबाहेर आपला परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळणार आहे.

उत्कृष्ट विकेटकिपिंग Wicketkeeping आणि धडाडीची फलंदाजी Batting यासाठी प्रसिद्ध असलेला ईशान किशन याला 2023 नंतर वारंवार भारतीय संघातमध्ये दुर्लक्षित केले होते . सध्या भारत कसोटी मालिकेच्या टीममध्ये ईशानला वर्णी लागली नाही. त्यामुळे ईशानने आपला फरफॉर्मन्स Performance सुधारण्यासाठी खेळातील कौशल्य दाखवण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याची ईशानची ही पहिलीच वेळ असणार आहे. ईशान किशनने त्याला मिळालेल्या या संधीबद्दल खुप आनंद व्यक्त केला. 26 वर्षीय ईशानाला मिळालेली ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. हा करार दोन काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठीचा करार असून , दक्षिण आफ्रिकेचा काइल व्हेरिनच्या South Africa's Kyle Vereen जागी ईशान खेळणार आहे.

22 जुन रोजी ट्रेंट ब्रिज येथे यॉर्कशायर Yorkshire विरुद्ध आणि 29 जून रोजी टॉंटन येथे सोमरसेट विरुद्ध असे हे दोन सामने होणार असून या सामन्यांमध्ये ईशानला आपला उत्कृत्ष्ट परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये त्याला आपल्या रेड बॉल क्रिकेटला सुद्धा आणखी चांगली सुधारण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यांबाबत ईशान किशन खूप उत्सुक असून इंग्रजी वातावरणात मला नवीन कौशल्ये शिकता येतील असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी