ताज्या बातम्या

Islampur City Name Changed : इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर केले जावे, अशी मागणी केली जात होती. यात भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचाही समावेश होता. दरम्यान, आता याच नामकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • इस्लामपूर शहर आता झाले ईश्वरपूर

  • राज्य सरकारने पाठवला होता केंद्राकडे प्रस्ताव

  • अधिसूचना जारी करण्यात आली, आता यापुढे…

गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव इश्वरपूर केले जावे, अशी मागणी केली जात होती. यात भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचाही समावेश होता. दरम्यान, आता याच नामकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लामपूर शहराचे नाव आता बदलण्यात आले आहे. यापुढे हे शहर इस्लापूर नव्हे तर इश्वरपूर म्हणून ओळखले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

इस्लामपूर शहर आता झाले ईश्वरपूर

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही माहिती देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. इस्लामपूर नगपारलिकेच्या लोकांकडून गेल्या बऱ्याच दिवसांपासून एक मागणी केली जात होती. इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं जावं, असं तिथल्या लोकांचं मत होतं. आता याच मतानुसार इस्लामपूरचं नाव इश्वरपूर करण्यात आलं आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने पाठवला होता केंद्राकडे प्रस्ताव

गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ सभागृहात इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहविभागाला या शहराचे नाव बदलण्यााबाबत एक प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, अशा भावनाही यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.

अधिसूचना जारी करण्यात आली, आता यापुढे…

या शहराच्या नामकरणाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता सांगलीतील शहराचं नाव इस्लामपूर नसेल. आता हे शहर ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहराचे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या नामकरणाचे परिणाम सांगली जिल्ह्यातील निवडणुकीवर पडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा