ताज्या बातम्या

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाची आएसओची भरारी ; विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते गौरव

Published by : Siddhi Naringrekar

संजय राठोड, यवतमाळ

प्रशासकीय कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले की, अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाज आणि वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय आयएसओ मानांकन प्राप्त पहिले कार्यालय ठरले आहे. विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते आयएसओ प्रमाणपत्र देऊन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वारावर प्रथम शुद्ध पाणी व प्रशस्त बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कामासाठी लागणारी कागदपत्रे, कोणाला भेटायचे याचे माहितीफलक तसेच माहिती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. कागदपत्रे मिळण्यासाठी अवधी असल्यास, नागरिकांना पुरवठा विभागाच्या संबंधित माहीतीसाठी टीव्ही संच लावलेला आहे.

तसेच मॉडेल स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती केली आहे. भिंतीवर पुरवठा विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. कार्यालयीन कामकाजाच्या कागदपत्रांची व्यवस्थित मांडणी करून विविध विभागांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्‍यांना कामे करणे सोपे आणि सुलभ झाले असून, कामाची गती वाढल्याचे दिसून येत आहे. तक्रारपेटी, शौचालय, सुव्यवस्थित कागदपत्रे, विविध विभागांना दिलेली नावे व ओळखपत्र परिधान केलेले अधिकारी व कर्मचारी अशा अनेक सुविधांमुळे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय लक्ष वेधून घेत आहे.

आयएसओ मानांकनाचे मुद्दे

कार्यालयाशी निगडीत सर्व कामे वेळेत पुर्ण करणे, सर्व वरिष्ठ, समकक्ष व कनिष्ठ स्तरावरील जिल्ह्यातील कार्यालयांना व संबंधित संस्थांना लोकाभिमुख पद्धतीने सेवा देतांना सकारात्मक भूमिका बजावणे, अन्न व नागरी पुरवठा विषयक माहितीचे संकलन करून सादर करणे, कार्यालयाच्या व विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणून सेवा वेळेवर आणि सातत्यपुर्ण देणे. कार्यालयाच्या देखभालीची सुधारणा करणे. बदलणाऱ्या गरजानुरूप सुधारणा करण्यासाठी या धोरणांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येवून त्यात बदल करणे.

यावर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले की, कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळविण्याठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच कार्यालयात मॉडेल स्वस्त धान्य दुकान तयार करून जिल्ह्यात सात लाख शिधापत्रिका धारक, दोन हजार ४१ स्वस्त धान्य दुकाने व अठरा गोडावून यांच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार , यांनी सांगितले.

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर