जगाच्या राजकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या घडामोडीमध्ये, इस्त्रायल आणि इराण यांच्यात थेट युद्ध सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट झाल्याने धुराचे लोट पसरले आहेत. दरम्यान, इस्त्रायलने "रायझिंग लँड ऑपरेशन" नावाची मोठी सैनिकी कारवाई सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
या दोन देशांमध्ये होणार युद्ध इतर देशांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्र, बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून मोठे हल्ले करत आहेत. ज्यामुळे हे युद्ध अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे, या युद्धपार्श्वभूमीवर इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डला उद्ध्वस्त केले आहे. ज्याचा परिणार इतर देशांना भोगावा लागू शकतो.
इस्रायलने इराणच्या ज्या ठिकाणी सर्वात मोठा हल्ला केला आहे, तिथे कतारचा मोठा वावर असतो. साऊथ पार्स गॅस फिल्ड हे गॅसनिर्मिती करते. यामुळे जगातील अनेक देशांना इराणमधील साऊथ पार्स गॅस फिल्डद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा केला जातो. इराणमधील साऊथ पार्स गॅस फिल्ड हे संपुर्ण जगातील गॅसनिर्मिती करणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे. जे इराण-इस्रायलच्या युद्धात इस्रायलने नष्ट केले आहे.
भारतासमोर नवीन आव्हाने निर्माण
इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्ड येथे तयार केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूचे रुपांतर एलएनजीमध्ये केले जाते, आणि तो बाकी देशांमध्ये विकला जातो. एलएनजीला लिक्विड नॅच्यूरल गॅस असंही म्हटलं जात. यामध्ये कतार हा देश मुख्य मानला जातो. भारत इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्ड येथून नैसर्गिक वायू खरेदी करत नसला तरी, कतारकडून एलएनजीची खरेदी करतो. त्यामुळे इस्त्रायलने केलेल्या या हल्ल्यात भारताला मिळणाऱ्या एलएनजीवरही परिणाम होऊन याचा मोठा फटका भारतालाही पडू शकतो.
इस्रायलला पाठिंबा देणारे देश-
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, चेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड
इराणला पाठिंबा देणारे देश-
रशिया, चीन, इजिप्त, तुर्की, पाकिस्तान, इंडोनेशिया, इराक, ओमान, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, लेबनॉन, जॉर्डन, हौथी, हमास, अफगाणिस्तान
मध्यस्थी करणारे देश-
संयुक्त राष्ट्र, भारत, जपान, आयर्लंड, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन, इटली