आता पाकिस्तानच्या हालचालींवर भारताची अवकाशातून नजर असणार आहे. इस्त्रोच्या 10 उपग्रहांचं पाकिस्तानवर बारीक लक्ष असल्याची समोर आली आहे. भारताचे 10 उपग्रह 24 तास पाकिस्तानवर लक्ष ठेवून असणार आहे. इस्त्रोचे अध्यक्ष व्ही.नारायणन यांनी ही माहिती दिली आहे. भारताची सीमा आणि प्रत्येक नागरिक सुरक्षित असणार असल्याचं देखील ते म्हाणाले आहेत.
एग्रीकल्चरल यूनिवर्सिटीच्या एका कार्यक्रमात या कार्यक्रमादरम्यान इस्त्रोचे अध्यक्ष व्ही.नारायणन म्हणाले की, आपल्याला देशाच्या सुरक्षेची काळजी घ्यायची असेल तर सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला पाकिस्तानवर नजर ठेवण्याची गरज आहे. देशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही 10 सॅटेलाईटवर सातत्याने काम करत आहेत. 18 मे रोजी इस्त्रो RISAT-1B या नावाचं एक सॅटेलाईट श्रीरीहरिकोटा येथून स्पेस सेंटरहून लॉन्च होणार आहे. यालाच EOS-09 नावानेही ओळखलं जाणार आहे".
RISAT-1B ही एक खास रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे ज्यामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तान, चीनच्या सीमेवर नजर ठेवण्यास मदत मिळणार आहे. या सॅटेलाईटमध्ये प्रत्येक वातावरणात वेगवेगळे फोटो घेता येतात, ज्यामुळे दहशतवाद्यांना पकडण्यास मदत मिळू शकते.