ST Mahamandal Job : एसटीची आता मेगाभरती! आता होणार 'इतक्या' पदाची भरती; किती ते लगेच जाणून घ्या...  ST Mahamandal Job : एसटीची आता मेगाभरती! आता होणार 'इतक्या' पदाची भरती; किती ते लगेच जाणून घ्या...
ताज्या बातम्या

ST Mahamandal Job : एसटीची आता मेगाभरती! आता होणार 'इतक्या' पदाची भरती; किती ते लगेच जाणून घ्या...

एसटी परिवहन मंडळाने भप्पर मेगा भरती प्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 17 हजार 450 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत.

Published by : Riddhi Vanne

ST Mahamandal Job : गेल्या अनेक दिवसांपासून परिवहन मंडळ चर्चेत पाहायला मिळत आहे. आता परिवहन मंडळाने भप्पर मेगा भरती प्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 17 हजार 450 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत.

लवकरच ही भरती प्रक्रिया होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीपासूनच 30 हजार रुपये पगार भेटणार आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, एसटी महामंडळात कंत्राटी चालक आणि सहाय्यक पदांसाठी ही भरती होणार आहे. ही प्रक्रिया राबवण्यासाठी शासकीय तयारी सुरू झाली असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे 2 ऑक्टोबरनंतर या पदांसाठी भरती सुरू होईल.

यामुळे अनेक तरुणांचे स्वप्न साकार होईल. भरती प्रक्रियेत यशस्वी उमेदवारांना सुरुवातीपासूनच किमान 30 हजार रुपयांपेक्षा अधिक पगार मिळणार आहे. त्यामुळे ही एक मोठी संधी आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आणि इतर बाबींची पूर्तता करण्याचे आवाहन करण्यात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

Special Report : रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं; बैठकीतील खडाजंगीचा Video Viral

Dadasaheb Phalke Award Announced : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

American tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचं आणखी एक महत्त्वाचं विधान, भारतावर होणार 'हा' मोठा परिणाम