ताज्या बातम्या

Festival Vargani : दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणीसाठी नियम! धर्मादाय कार्यालयाची परवानगी बंधनकारक

आगामी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यानुसार शिक्षा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Prachi Nate

आगामी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा कलम 66 क नुसार तीन महिने कारावासाची शिक्षा आणि विनापरवानगी जमा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडाची तरतूद आहे.

ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी केली आहे, त्यांना वेगळ्या परवानगी आवश्यकता नाही. मात्र, सर्व आर्थिक वर्षांची हिशोबपत्रके ऑनलाइन दाखल करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत नसलेली मंडळे आणि संस्थांनी ट्रस्ट कायद्याच्या कलम 41 क अन्वये वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक आहे.

अर्ज मंजूर झाल्यावर पावतीवर मंजुरी क्रमांक टाकून वर्गणीची पावती द्यायची. कार्यक्रम संपल्यावर जमा, खर्चाचा अहवाल धर्मादाय कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक उत्सवादरम्यान मंडळांनी निधी संकलनाबाबत बदललेल्या दंडात्मक तरतुदींचे भान ठेवणे आवश्यक आहे. वर्गणीच्या अफरातफरीबाबत तक्रार झाली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rohit Pawar : रोहित पवारांचा दादर कबुतरखाना प्रकरणावर भाष्य; “पक्ष्यांना अन्न न मिळाल्यामुळे मृत्यू होऊ नये...”

Pregnancy : गर्भारपणात मांसधातूचे पोषण; आयुर्वेदाचे मार्गदर्शन

Thackeray Brothers : सर्वात मोठी बातमी! मुंबईतील 'ही' निवडणुक ठाकरे बंधू एकत्र लढणार

Uttarakhand Cloudburst : उत्तराखंडमध्ये ढगफुटीचा कहर; पुण्यातील 19 पर्यटक बेपत्ता