ताज्या बातम्या

ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत - हरिभाऊ राठोड

मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.

Published by : Dhanshree Shintre

मराठा आरक्षणावरुन ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष सुरु आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देवू नये म्हणून विरोध केला आहे. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. अशी परिस्थिती असताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांवर आरोप केला आहे

बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे - सोयऱ्याच्या राजपुत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही. ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत.

परंतु तेही सांगत नाही की मराठा समाजाला आरक्षण देणार कसे? एकीकडे ओबीसीला भावनात्मक भडकावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून भाजपात जाण्याचे तयारी करीत आहे. म्हणजेच हे दोन्ही नेते बबन तायवडे आणि छगन भुजबळ हे नागपूरकडे झुकले आहेत. हे उघड - उघड ओबीसींना मूर्ख बनवत आहेत. असे विधान ओबीसी नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."