ताज्या बातम्या

बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडणे हा आरोपीचा दयाळूपणा; हायकोर्टाची वादग्रस्त टीप्पणी

मध्यप्रदेशातील उच्च न्यायालयाने बलात्कारच्या आरोपीची शिक्षा कमी केली आहे. यादरम्यान न्यायालयाने केलेली टीप्पणी आता चर्चेत आली आहे. चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिला जिवंत सोडले हा त्याचा दयाळूपणा असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

इंदौर : मध्यप्रदेशातील उच्च न्यायालयाने बलात्कारच्या आरोपीची शिक्षा जन्मठेपेवरून 20 वर्षांपर्यंत कमी केली आहे. यादरम्यान न्यायालयाने केलेली टीप्पणी आता चर्चेत आली आहे. चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिला जिवंत सोडले हा त्याचा दयाळूपणा असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या टीप्पणीवर आता सर्वच स्तरावरुन टीका करण्यात येत आहे.

आरोपीने उच्च न्यायालयात शिक्षा कमी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी करताना न्यायालयाने म्हंटले की, आरोपीचे हे राक्षसी कृत्य असून महिलांप्रती कोणताही सन्मान नाहीये. व १४ वर्षांच्या मुलीसोबतही लैंगिक अत्याचार त्याच्या याच प्रवृत्तीचे दर्शन घडविते आहे. निकालात कोणतीही चुक झाली नसून हे न्यायालय अशा गुन्ह्यांना योग्य मानत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर आणि न्यायमूर्ती सत्येंद्र कुमार यांच्या खंडपीठाने नोंदवले.

परंतु, आरोपीने बलात्कारानंतर मुलीला जिवंत सोडले. तो त्याचा दयाळूपणा दर्शवतो. त्यामुळे त्याची जन्मठेपेची शिक्षा कमी होऊ शकते, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला 20 वर्षाची कठोर शिक्षा भोगावीच लागेल, असे सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी पीडितेच्या कुटुंबाच्या झोपडीजवळील तंबूत राहत होता. ते सर्व मजूर म्हणून काम करत होते. एक रुपया देण्याच्या बहाण्याने त्याने चिमुकलीला झोपडीत बोलावले. व तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. पीडितेच्या आजीने आरोपीला तिच्यावर बलात्कार करताना पाहिले. त्यांची साक्ष आणि वैद्यकीय पुराव्यांवरून मुलीवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले होते. यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, उच्च न्यायालयाने ही शिक्षा कमी करुन 20 वर्ष कारावास सुनावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा