ताज्या बातम्या

Jaat Film : 'आसानी से हार नहीं मानेगा 'सनकी' जाट'; 'गदर 2' पेक्षा 'जाट'ची कमाई जास्त

सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 50 कोटींचा आकडा ओलांडला.

Published by : Rashmi Mane

सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 50 कोटींचा आकडा ओलांडला. या चित्रपटात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. यावरून बराच वाद झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई ज्या वेगाने वाढत आहे ते पाहता असे दिसते की, 'जाट' आता थांबणार नाही.

'जाट' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. सॅकॅनिल्कच्या मते, जाटने आतापर्यंत सुमारे 80.17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामध्ये पहिल्या आठवड्यात भारतात 61.65 कोटी रुपये कमावले. हा चित्रपट आता दुसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. 'सिकंदर'ला हरवल्यानंतर, तो अक्षय कुमारच्या 'केसरी 2' शी स्पर्धा करत आहे.

हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरातील कलेक्शनच्या बाबतीतही आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 102.25 कोटी रुपये कमावले आहेत. या वर्षातील हा पाचवा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. याआधी फक्त राम चरणचा 'गेम चेंजर', सलमान खानचा 'सिकंदर', अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' आणि विकी कौशलचा 'छावा' हे चित्रपट कमी वेळात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकले आहेत.

देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत सनी देओलच्या कारकिर्दीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाचा विक्रम आहे. यापूर्वी 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर'ने 76.88 कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या क्रमांकावर होते. 'गदर 2' 525 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे.

या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये 'जाट' हा चौथा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे. 'जाट'ने पहिल्या दिवशी 9.62 कोटी कमावले. याशिवाय 'छावा', 'सिकंदर' आणि 'स्काय फोर्स' चित्रपटाचा समावेश आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today :सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश