विधान परिषदेसाठी जगदीश मुळीक यांचं नाव पुन्हा चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. विधान परिषदेच्या 3 जागा या भाजपकडे असणार आहेत.
वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचं नाव यासाठी चर्चेत आहे. विधानपरिषदेच्या 5 जागा रिक्त झाल्या आहेत.
27 मार्चला निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जगदीश मुळीक यांना संधी देऊन पक्ष त्यांचं पुनर्वसन करणार का, हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.