ताज्या बातम्या

'जय जय महाराष्ट्र' माझा हे राज्यगीत होणार; मंत्री सुधीर मुनगंटीवार निर्णय घेणार

Published by : Siddhi Naringrekar

"जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत लवकरच राज्य गीत म्हणून घोषित होऊ शकते. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे या गीताची निवड राज्य गीत म्हणून केली जाऊ शकते. सध्या देशातील ११ राज्यांत स्वतःचे राज्य गीत वाजवले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गीत वाजवले जाईल. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक विभागाने जय जय महाराष्ट्र या गीतासह "बहु असोत सुंदर संपन्न की महा" आणि "मंगल देशा, पवित्र देशा" या दोन गीतांवर विचार केला होता. अखेर शाहीर साबळे यांनी गायलेले जय जय महाराष्ट्र या गीताची निवड करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान तीन कडव्यांच्या या गीतास कात्री लावण्याची शक्यता आहे.

हे गाणं राज्याचे अधिकृत गीत म्हणून सरकारशी संबंधित सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे गाणं लवकरच वाजवणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रगीत हे 52 सेकंदाचं आहे. जय जय महाराष्ट्र हे गीत मूळ शब्द बदलले जाणार नाहीत याची काळजी घेत 1.15 ते 1.30 मिनिटांत बसेल असं नियोजन केलं जात आहे. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणं गायलं जाईल आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता होईल अशी माहितीही मुनगंटीवर यांनी दिली.

कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. २०१५ मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत रिलीज होणार आहे.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं