हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर या चित्रपटावरून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे.माजी खासदार आणि राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि 12 कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कालची रात्र पोलीस स्टेशनमध्येच घालवावी लागली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आव्हाड यांना काल न्यायालयात हजर करण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मेडिकल तपासणी नंतर पुन्हा आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिस ठाण्यात आणले. आज(शनिवारी) त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. यामुळे आव्हाड यांना जामीन मिळणार की या प्रकरणात पुढे काय होणार? हे आज कोर्टाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.