शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात (Manikrao Kokate ) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. या निकालाविरोधात कोकाटेंनी उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून धाव घेतली आहे. त्यावर आज (दि.19) हायकोर्टात न्यायमूर्ती लढ्ढा यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर युक्तीवर करताना कोकाटेंच्या वकिलांनी नाशिक सत्र न्यायालायाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिल्याचे सांगितले. युक्तीवादावेळी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा संदर्भदेखील कोकाटेंचे वकील कदम यांच्याकडून देण्यात आला. त्यावर राहुल गांधी आणि ही केस वेगळी असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. युक्तीवादावेळी अफजल अन्सारींच्या 4 वर्षांच्या शिक्षेलाही स्थगिती देण्यात आल्याचा संदर्भही कोकाटेंचे वकील रवींद्र कदम यांनी दिला.
कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी दाखल याचिकेवर सुनावणीवेळी सरकारी वकिलांना कोकाटेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले आहे. परंतु, अद्याप कोकाटे अद्यापपर्यंत पोलिसांना शरण आलेले नाही. तर, दुसरीकडे कोकाटेंच्या वकिलांकडून सोमवार किंवा मंगळवारपर्यंत तात्पुरता दिलासा देण्यात यावा अशी विनंती कोकाटेंचे विकील रवींद्र कदम यांनी केली. तर, याप्रकरणात अद्याप अंतरिम आदेश दिलेला नसल्याचे कोर्टाने सुनावणीवेळी सांगितले.
1989 साली घरासाठी अर्ज करताना कोकाटेंनी त्यांची मिळकत 2500 रुपये दाखवली असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच, वारंवार कळवूनदेखील कोकाटे सुनावणीला उपस्थित राहिले नसल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले. सरकारी वकिलांच्या या युक्तीवादावर उत्तद देताना कोकाटेंचे वकील 1993-94 मध्ये त्यांची मिळकत वाढल्याचे सांगत आर्थिक परिस्थिती बदल असते असे कदम यांनी सांगितले. एखाद्याला घर मिळाल्यानंतर पुढील काही वर्षांत त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली, उत्पन्न वाढले, तरी घर परत करण्याचे कोणतेही प्रावधान कायद्यात नाही.
घर मिळाल्याची तारीख आणि नंतरची परिस्थिती दोन्ही बाबी वेगवेगळ्या असल्याचा युक्तीवादही कोकाटेंचे वकील कदम यांनी केला. यावेळी कोर्टाने कोकाटेंच्या वकिलांना PWD ने काय उलट तपासणी केली ते वाचून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर युक्तीवर करताना कोकाटेंच्या वकिलांनी नाशिक सत्र न्यायालायाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिल्याचे सांगितले.
नाशिक पोलिसांचा लिलावती रूग्णालयात ठिय्या
नाशिक सत्र न्यायालायने अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. काल (दि.18) पोलिसांनी कोकाटेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. जवळपास मध्यरात्री 1 वाजेपर्यंत रूग्णालयात होते. दरम्यान, कोकाटेंवर आज माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याचेही समोर येत आहे.
अजित पवारांनी राजीनामा स्वीकारला
कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) कोकाटेंनी दिलेला राजीनामा काल (दि.18) स्वीकारल्याचे एक्सवर पोस्ट करत सांगितले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटे यांचा राजीनामा राज्यपाल देवव्रत यांच्याकडे सुपुर्द केला होता. राज्यपालांनीदेखील कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
अजितदादांकडे क्रीडा खात्याचा कारभार
अटकेची टांगती तलवार असलेल्या कोकाटेंनी काल (दि.17) त्यांच्या पदाचा राजीनामा दिली होता. त्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी अजित पवारांना देण्यात आली आहे. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा(Manikrao Kokate ) यांनी दिला असून त्यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे क्रीडाखात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
कोकाटे यांची राजकीय कारकिर्द कशी?
1978 – एच पी टी कॉलेजच्या जी. एस. पदी
14 ऑगस्ट 1991 – युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
1992- जिल्हा परिषद सदस्य
1993- 1996 पंचायत समिती सभापती
24 वर्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे1996 पासून आज तगायत संचालक
जिल्हा बँकेत तीनदा चेयरमन म्हणून नियुक्ती
1997 साली पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य
1997 – नाशिक जिल्हा परिषद कृषी व पशु संवर्धन सभापती
1999 साली पहिल्यांदा आमदार
2994 साली सलग दुसऱ्यांदा आमदार
सिन्नर दूध उत्पादक संघाची स्थापना व आज तगायत संचालक व चेयरमन1 जानेवारी 2008 साली
2008 09- महाराष्ट्र शिखर बँक संचालक
2009 साली सलग तिसऱ्यांदा आमदार
2014 विधानसभा निवडणुकीत पराभव
2019- ला अपक्ष लोकसभा निवडणूक लढवून पराभव
2019- विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आमदार.
सिन्नर विभागीय दूध संघाचे चेअरमन
2024- विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी