थोडक्यात
पुणे जैन बोर्डिंग हाऊस व्यवहार रद्द
धर्मादाय आयुक्तांनी दिला आदेश
गोखले बिल्डर्सने व्यवहार रद्द करण्याची केली होती मागणी
गेले काही दिवस पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिन व्यवहाराचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या व्यवहारावरून जैन समाज देखील चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून पुण्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. दरम्यान या प्रकरणात आता धर्मादाय आयुक्तांनी मोठा निर्णय दिला आहे. धर्मादाय आयुक्तांनी गोखले बिल्डर्स आणि पुणे जैन बोर्डिंग हाऊस यांच्यामधील व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता हा व्यवहार रद्द झाला आहे. काही दिवसांपूर्वी गोखले बिल्डर्सने ईमेल करत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली होती.