Dadar Kabutar Khana : कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली Dadar Kabutar Khana : कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली
ताज्या बातम्या

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक; आंदोलकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली

मुंबई दादर: कबुतरखाना हटवण्यावरून जैन समाज आक्रमक

Published by : Riddhi Vanne

Jain community Has Become Aggressive In Mumbai Dadar Kabutar Khana : कबूतरामुळे होणाऱ्या आजारांना लक्षात घेऊन महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत पालिकेने याचिका दाखल करत जो व्यक्ती कबुतरांना अन्न देईल अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे असे आदेश महापालिकेने दिले होते. पालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री लावली होती. आज मात्र दादरमधील कबुतरखान्यावर मोठ्या प्रमाणात जैन समाज एकत्र आला आणि परिसरात ताण-तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले महापालिकेकडून लावण्यात आलेली ताडपत्री जैन समाजाकडून काढण्यात आली. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. काही महिलांनी कबूतरखान्यात उतरल्या होत्या. आज कबुतरखाना परिसरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज सकाळी कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवून जैन समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

याचपार्श्वभूमीवर दादर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिस आंदोलकांना थांबण्याचे काम करत आहेत. सध्या दादरमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा

Dadar Kabutar khana : दादरच्या कबुतरखान्याचा वाद हायकोर्टात, आज सुनावणी

Latest Marathi News Update live : दादरच्या कबुतरखान्याचा वाद हायकोर्टात, आज सुनावणी

Latest Marathi News Update live : मुंबईतील बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना, मनसेची युती